Nitai.tv : YouTube : Old Videos : SoundCloud : eBook : Veda : Scriptures : हिन्दी : ગુજરાતી : Donate

निताइ वायुलेखन, निताइ नाम, लीला


(Vasudha Nitai dasi) #1

(मराठी) निताइ वायुलेखन मिशन (Marathi):
श्रील निताइप्रेष्ठजी भक्तिरत्न साधु यांच्या इंग्रजी भाषेतील लेखाचे मराठी भाषेत रूपांतर.

:large_blue_circle: कोण आहेत भगवंत निताइ ?

भगवान निताइ अंत्यंत दयाळू सर्वश्रेष्ठ उत्पत्ती आणि सृष्टीतील सर्व जीवांचे आदिगुरू आहेत. भगवान निताइ हे श्री श्री राधाकृष्ण चे सम्मीलीत रूप असलेले भगवान गौरांग चे अध्यात्मिक थोरले भाऊ आहेत. ते स्वतः भगवान बलराम आहेत. ते नित्यानन्द नावानेही ओळखले जातात, म्हणजेच अंतरीय आनन्द. भगवान निताइ हे सर्वोत्तम गुरू व भक्त असून ते स्वतः भगवंत आहेत. सर्व जीव निताइतून निर्माण झाले असून त्यांचे अंतर्गत संबंधी आहेत. निताइ हे आपल्या हृदयातील परमात्मा आहेत आणि ते आपल्या सर्व क्रियांचे व विचारांचे साक्षीदार आहेत. या जगात आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त निताइच जाणतात.भगवान निताइ व भगवान गौरकृष्ण अभिन्न आहेत. दोघेही सर्वावताराचे स्त्रोत असून मुख्य आहेत.

:large_blue_circle: का फक्त निताइ ?

या विश्वातील त्रास कमी होणारच नाही जोपर्यंत लोक परमदयाळु भगवान निताइला समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. आपल्याकडून कळत-नकळत वारंवार होणारे पाप-अपराध त्वरीत पुर्णतः विसरून क्षमा करतात व परस्पर अहैतुकी कृपेने शुद्ध प्रेम व आनन्द देऊन आदर-सन्मान करतात. संपूर्ण सृष्टीत एकमेव भगवान निताइच आहेत की जे आपले कर्म बदलतात व एकूण एक जीवांच्या दुःखाचा अंत करतात. कारण सर्व जीव निताइचेच अंश व वंश आहेत. फक्त निताइ नामच एकूण एक जीवाची शुध्दता वाढवून व अपात्रता न गणता आत्मसाक्षात्कारी शुद्ध भक्त बनविते. भगवान गौरकृष्ण म्हणतात की माझ्या भक्तांची पुजा माझ्या पुजे पेक्षाही उच्च आहे. म्हणूनच फक्त निताइची पूजा गौरकृष्ण पेक्षाही उच्च आहे जरी ते दोघे सर्वोत्तम भक्त व भगवंत असले तरी.

:blue_book: माझे शूर सरदार निताइ आता कसली आली कलीची भीती ।
निताइ नामाच्या धारीने मिटे खोटी माया, ममता, नाती ॥

:blue_book: निताइ वायुलेखनाने उमगली गौरप्रेमाची रीत ।
लाख संकट आले तरी न सूटे निताइ वायुलेखनाची प्रित ॥

:blue_book: निताइ वायुलेखनकार कलिशी लढून जगतो व मरूनही जगतो ।
कठीण परीस्थीतीस जिंकून यशाचे शिखर गोलोक गाठतो ॥

:blue_book: निताइ वायुलेखने रमे राधा-रमण ।
निताइ वायुलेखने मिळे धाम वृंदावन ॥

:blue_book: अदभुत अलौकिक निताइ वायुलेखन ।
जाणता-अजाणता मिळे गौर प्रेमधन ॥

:blue_book: निताइ वायुलेखनाने वाजविला डंका ।
जळून भस्म होइ कलि लंका ॥

:blue_book: कलिरूपी इंगळी अतिशय दारूण ।
जीवांस हैराण करी नांगी मारून ।
तडपतो जीव असंख्य वेदनेन ।
यावर उपाय निताइ वायुलेखन ॥

:blue_book: दर्शन कधी देशील निताइ भगवंता ।
अंत नको पाहूस तू अनंता ।
परमकृपाळू हे पद्मावती सुता ।
कृपा करी मजवर हे कृपावंता ॥

:diamond_shape_with_a_dot_inside: निताइ वायुलेखनाने नित्य निताइ गुण गाऊ ।
निताइ चरणी नित्य लिन राहू ॥

:diamond_shape_with_a_dot_inside: निताइ वायुलेखनाने उगवतात सुविचार आणि मावळतात अविचार ॥

:diamond_shape_with_a_dot_inside: कलिजीव आहेत निताइची प्रिय मुले ।
निताइ वायुलेखनाने निताइ चरणी वाहूया कमळ फूले ।
निताइ वायुलेखन न करणारे सारे आहेत खुळे ॥

:diamond_shape_with_a_dot_inside: निताइसम भगवंत न मिळे त्रिभुवनावरी ।
हृदयात नांदतो सदा निताइ हरी ।
न जावे लागे उंच गडावरी ।
असा माझा निताइ कैवारी ॥

:diamond_shape_with_a_dot_inside: गड्यांनो निताइप्रेष्ठजींचे ऐकावे,
रोज निताइ वायुलेखन करावे ,
निताइचे गुण-धाम अचरावे,
मनवांच्छित फळ साधावे ,
निशुल्क गोलोक मिळवावे ॥

:diamond_shape_with_a_dot_inside: रोज किमान 108 निताइ वायुलेखन करावे ।
त्यास न लागे घाम गाळावे ॥

श्रील निताइप्रेष्ठजी भक्तिरत्न साधु

!! निताइ भावनामृत ही गौरकृष्ण भावनामृत पेक्षाही सर्वोच्च आहे !!

जर तुम्ही गौरकृष्ण ची भक्ति(पुजासेवा) निताइच्या भक्ति पेक्षा अधिक कराल तर गौरकृष्ण प्रसन्न होतील की नाही याची शाश्वती नाही.

परंतू जर तुम्ही निताइची भक्ति गौरकृष्ण पेक्षाही अधिक कराल तर “निताइ” प्रसन्न होतीलच याची शाश्वती 100% आहे. कारण निताइ गौरकृष्णाचे सर्वोत्तम भक्त आहेत व भगवंताच्या सर्व भक्तांचे एकत्रीकरण आहेत.

कारण एस.बी.11.19.21 आणि आदिपुराण यामध्ये सांगितले आहे की, " माझ्या भक्तांची पुजा माझ्या स्वतःच्या पुजेपेक्षाही उच्च आहे, आणि माझ्या भक्तांचे भक्त हे सर्वोच्च भक्त आहेत जेव्हा की थेट माझे भक्त हे माझे भक्त नाहीत. "

कारण पद्मपुराण, शांडील्य स्मृति आणि गोविंद भाष्य 3.3.51 मध्ये सांगितले आहे की, " जे थेट भगवंताचे भक्त असतात ते परिपूर्ण असतील यात शंका आहे परंतु भक्तांचे भक्त परिपूर्ण असतील यात कसलीही शंका नाही, जे थेट भगवंताच्या चरणकमळांची पुजासेवा करतात त्यांचे मन शुद्ध नसेल परंतु जे भगवंताच्या भक्तांच्याही भक्तांचे चरणकमळ पुजतात त्यांचे मन शुद्ध असते. "

म्हणून निताइची भक्ति ही गौरकृष्ण च्या भक्ति पेक्षाही सर्वोच्च व अधिक लाभदायक आहे.

“श्रील निताइप्रेष्ठजी भक्तिरत्न साधु”

!! निताइ वायुलेखनाच्या एक फेरीस लागणारा कालावधी !!

तुम्ही किती मोठ्या आकारात निताइ मंत्र हवेत लिहीतात आणि त्यामधील सर्व उच्चारावयवाचा किती खोलवर अर्थ समजून ध्यान-चिंतन करतात यावर निताइ वायुलेखनाच्या एक फेरीस लागणारा कालावधी अवलंबून आहे. निरीक्षणावरून निताइ वायुलेखनाची एक फेरी पूर्ण करण्यास लेखनकारास सरासरी 15 - 20 मिनिटे लागतात.

टीप : 1 वायुलेखन = हवेत 108 वेळा निताइ लिहिणे

कृपया लक्षात ठेवा गुणवत्ता ही नेहमीच परिमाणा पेक्षा महत्वाची आहे. फक्त एक गुणवत्ता आपणांस क्रमाक्रमाने मोजमाप वाढविण्याची प्रेरणा देते. ज्या भक्तांना निताइ वायुलेखनाची एक फेरी पुर्ण करण्यास 10 मिनिटे लागतात त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी गुणवत्तेवर जास्त भर द्यावा.

निताइच्या उच्चारावयांवर एकदाच
अतिशय खोलवर व स्पष्ट ध्यान-चिंतन केल्यास नक्कीच आपले जीवन कायमचे बदलते.म्हणून कृपया निताइ वायुलेखन करतांना प्रत्येक उच्चार अवयवांची स्पष्टता , ध्यानचिंतन, अर्थ व स्मरणाची प्रखरता यास प्राथमिक महत्व द्यावे.

:green_heart: झाडांची मुळे पाणी मिळेल याची वाट बघत बसत नाहीत, ती पाणी शोधण्याच्या प्रयत्नात वाट मिळेल तिकडे धाव घेतात. त्याचप्रमाणे कलिजीवास नुसत्या भौतिक शक्तीने आनंद मिळविण्यात यश मिळणार नाही. त्यासाठी सतत - निरंतर निताइ वायुलेखनासंगे निताइ किर्तन केल्याने सहज शीघ्रतेने नित्य आनंद प्राप्त होइल.
आपणास परमानन्द मिळविण्यासाठी भटकण्याची गरज नाही. श्रील निताइप्रेष्ठजी भक्तिरत्न साधु यांनी अथक प्रयत्नांनी सर्व कलिजीवास नित्य परमानन्द मिळावा याकरिता निताइ वायुलेखन हा लघुमार्ग सर्व कलिजीवास निशुल्क प्रदान केला आहे.

निताइ भावनामृत निताइ मिशन संस्थापकाचार्य श्रील निताइप्रेष्ठजी भक्तिरत्न साधु यांचा जयजयकार असो.

:oncoming_automobile: निताइ वायुलेखन कलिजीवाचा एकमेव आधारस्तंभ आहे .

:oncoming_automobile: संपूर्ण विश्वात कुठेही असो आपण निताइ वायुलेखन करून त्याचा लाभ घेवू शकतो.

:oncoming_automobile: निताइ वायुलेखन हेच कलियुगाच्या संघर्षाच्या अंधकारमय युगात भय आणि ताणतणावाने ग्रस्त असलेल्यांचा सर्वोत्तम योगाभ्यास आहे.

:oncoming_automobile: निताइ वायुलेखन जपातील अडचणी उदाहरणार्थ जपात एकाग्र न होणे, जपात रूची किंवा आकर्षणाचा अभाव आणि मनाची भटकंती यांवर पुर्णत: नियंत्रण करते.

:oncoming_automobile: निताइ वायुलेखन क्षणाक्षणात भक्तीच्या नित्यनविन रूप, रस आणि लक्षणांचा विस्तार करते.

।। संसार-संकट मोचन निताइ ।।

"संसारेर पार होइया भक्तिर सागरे
जे डूबीबो से भजूक निताइ चांदेरे "

‘निताइचांदच्या भक्ति सागरात कलिजीवास डूबावे लागेल, भजावे लागेल तेव्हाच जीव संसाररूपी भवसागरास सहजतेने पार करेल’

संसाराच्या दुःखमय ,कष्टमय गडड अंधकाराचा मार्ग पार करण्यासाठी निताइ भक्तिची नितांत आवश्यकता आहे. संसाररूपी पापमार्ग निताइ भक्ति सागराच्पा शक्तीशाली लाटांच्या प्रखर आघाताने नष्ट होतील व आपणास जीवन चक्राच्या भवर्‍यातून अलगदपणे बाहेर काढतील. आणि आपण परमानंद निताइच्या प्रेमरूपी भवर्‍यात भिरभिर भिरभिर गिरक्या घेत आपल्या शाश्वत गोलोक गृहात झटकन पोहोचू. यासाठी आपणास निताइ नामरूपी महासागरात डूबावे लागेल, भिजावे लागेल, निताइ नामात तल्लीनतेने उन्मत्त व्हावे लागेल.हा भक्तिचा सागर म्हणजेच निताइ वायुलेखन होय.

निताइ नाम सागराच्या लाटा जीवास उचलून आपटून संसाररूपी भवसागरात फेकत नाही तर क्रमाक्रमाने प्रेममय भक्तित जखडून ठेवण्यासाठी न थांबता एकापाठोपाठ निरंतर येवून घट्ट सुरक्षित शाश्वत आलिंगन देतात. या आलिंगनात फक्त आणि फक्त आनंद, सुखानंद, परमानंद,सच्चिदानंद भरलेला आहे. यात दुसरे काही नाही…काही नाही…काही नाही.

निताइ सागरात दडले आहेत प्रेमरत्न, भक्तिरत्न, भावमणी-माणके, भक्तिहीरे, परमभक्ति ज्ञानरूपी सोने-चांदी,खनिजे,क्षार, मोती-मणी,आनंद, लाभ,नफा यांचा अखंड खजिना आहे. या खजिन्याची किल्ली ’ निताइ वायुलेखन 'आहे.

"आर कबे निताइ चांदेर करूणा होइबे
संसार वासना मोर कबे तुच्छ हबे "

संसाराच्या दुःखमप सागरात संसार दुःख न भासणे हे शक्य आहे का ? आपल्या निताइस अशक्य असे काहीच नाही. हे फक्त निताइच्या अपार करूणेमुळे शक्य आहे.

निताइ वायुलेखनाने करावे निताइ नामसंकीर्तन ।
निरंतर डूबावे, भजावे पावावे प्रेमधन ।
निताइ भक्ति महाशक्तीचे करावे रसस्वादन ।
संसाररूपी सागराचे सूटे भवबंधन ।
निताइ गायन किर्तन चिंतन भजनात व्हा तल्लीन ।
नाही दुसरे गान निताइ गाना समान ।
मिळवा शाश्वत सनातन निताइ प्रेम आलिंगन ।
हेच आहे कलिजीवास निताइप्रेष्ठजींचे आवाहन ।
तर मग चला गड्यांनो गुरू आज्ञा पाळूया करून निताइ वायुलेखन ।
निताइप्रेष्ठजींच्या चरणी करूया आत्मनिवेदन ।
निताइ वायुलेखन आहे कलिजीवाच्या उन्नतीचे महाप्रेम साधन ।
जय जय निताइ संसार-संकट मोचन ।

निताइप्रेष्ठजी : निताइ वायुलेखन केवळ सर्वोत्कृष्ठ साधन नसून भक्तिचे आवश्यक अंग आहे.

श्रील निताइप्रेष्ठजी भक्तीरत्न साधु :

बघा बघा निताइ नाम अक्षर ची महिमा |
अधम जीवास चढवी उर्ध्व सीमा ||

श्रील निताइप्रेष्ठजी भक्तीरत्न साधु :

एका क्षणात महा-पातकी मधाई चे कल्याण,
त्यास केले निताइ ने श्रीवास हरिदास समान ||

'दगड ’ तोपर्यंत सुरक्षित राहतो जोपर्यंत तो डोंगरासोबत राहतो.

‘पान’ तोपर्यंत सुरक्षित राहते जोपर्यंत ते झाडासोबत राहते.

आणि ‘कलिजीव’ तोपर्यंत सुरक्षित राहतो जोपर्यंत तो निताइशी निगडीत राहतो.

श्रवणम किर्तनम निताइ संकर्षणम
जान्हवा वल्लभम निताइचंद्रं भजे

अर्चनम वंदनम निताइपाद सेवनंम
निताइ पद मम आत्मनिवेदनम

निताइ दास्यम साख्यम निताइ ध्यान स्मरणम
पद्मावती सुत निताइ निलांबरम

जान्हु-वसु प्रियंम एकचक्रेश्वरम
गौड-देश त्राता अभिमान शुण्यंम

आनंदम वर्धनम अनर्थ नाशकम
कोटि-भ्रमाण्ड पति अवधूत सुन्दरम

अच्चुतम केशवम कलिजीव मंगलम
पाप ताप हरे निताइ भावनामृतम


(Parth Amritkar) #2

खरंच, निताइंहून प्रेमळ व कारुणिक अन्य कोणीही भगवत्स्वरूप नाही. निताइ गौर ! हरिबोल !